Pages

Wednesday, 11 October 2017

गुण गौरव कार्यक्रम

_*राहुरी तालुका शिक्षक’ मित्रमंडळाच्या गुणगौरव पुरस्काराचे उत्साहात वितरण*_

    _राहुरी तालुका शिक्षक’ मित्रमंडळ व प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या गौरव पुरस्कारांचे वितरण राहुरीत उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अनिल दौंडे होते._

   _महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा,डॉ.सुधा कांकरिया,डॉ.उषाताई तनपुरे,गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे ,पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,शिवशाहीर विजय तनपुरे,पत्रकार विनीत धसाळ , ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या नंदा दिदी ,अनिल दौंडे,राहुरी शिक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र अरगडे आदींच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला._

   _याप्रसंगी राहुरी तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील म्हैसगाव केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर निळे यांना सेवा गौरव तर कला दिग्दर्शन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या दीपक देशमुख यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले._

_*नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपाध्यापिका यांना विशेष शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.श्रीमती लीना पाटील मॅडम यांना पुरस्कार प्रदान करत असताना  सभागृहातील शिक्षक बंधू भगिनी यांनी उभे राहून (Standing ovation) टाळ्यांच्या गजरात पाटील मॅडम यांच्या शौर्याचे कौतुक केले*_

_राहुरी तालुक्यातील विविध उपक्रमशील शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले धोंडिभाऊ सुंबे,राष्ट्रशिल्पकार पुरस्कार विजेते मारुती साबळे,विजय कांडेकर ,बाळू म्हस्के यांचा गौरव करण्यात आला.या वर्षी स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेत क्रमांक मिळवणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाव वस्ती(मानोरी) व राहुरी नगरपरिषदेची नूतन मराठी शाळा नं.९ येवलेवस्ती या शाळांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.तसेच बालकलाकार कांक्षिणी मनोज देशमुख हिचा चित्रपटात अभिनयाबद्दल गौरव करण्यात आला.शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेले सोमेश सजन,वैभवी शिंदे व माध्यमिक शालांत परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणारा अविष्कार कोळपकर यांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.शिक्षकरत्न पुरस्काराचे मानकरी मच्छिंद्र लोखंडे यांचाही गौरव करण्यात आला._

      _या प्रसंगी बोलताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा म्हणाले की पुरस्कारातून सकारात्मक कार्यासाठी ऊर्जा मिळत असते.आत्मसमाधानासाठी केलेले कोणतेही कार्य उत्कृष्ट असते.शिक्षक हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून शिक्षकांनी प्लास्टिकमुक्त जीवन ही संकल्पना रुजवावी._

    _तर डॉ.सुधा कांकरिया यांनी व्यक्तिमत्व विकासात राजयोग  ध्यान धारणेचे महत्व सांगितले. धावपळीच्या युगात भौतिक सुखाबरोबरच मानसिक शांतीही आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.राहुरी शिक्षक मित्र राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांनी शिक्षकमित्र मंडळाचे कौतुक केले.याप्रसंगी शिक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र अरगडे यांनी मित्रमंडळाचे विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिलीव आगामी काळात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शिक्षकांचा व्यक्तिमत्व विकास यासाठी शिक्षक मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले._

     _याप्रसंगी केंद्रप्रमुख संघटनेचे तालुका अध्यक्ष किसनराव माने ,केंद्रप्रमुख हसीना शेख,मंगला सोळस्कर,कल्याण राऊत आदी उपस्थित होते._

_कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल पवार,योगेश देशमुख,शिवाजी वाघ,नाना सोमवते,सुरज धनवडे,अमोल मांगुर्डे,निवृत्ती धुमाळ,संदीप साकुरे,पंडित हजारे,देवेंद्र विघ्ने,गणेश झावरे,विक्रम जाधव,नवनाथ लाड,राहुल खराडे,गोरक्षनाथ विटनोर,नामदेव दातीर,नाना रुपनर,प्रभू बाचकर,गीताराम पवार, विठ्ठल बर्डे,आदींनी प्रयत्न केले._

    _अनिल विधाते यांनी प्रास्ताविक केले तर प्रसिद्ध कवी गणेश शिंदे सूत्रसंचालन केले तर प्रजापिता विद्यालयाच्या प्रमुख नंदादेवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दै. पुण्यनगरी






दै. लोकमत



दिव्य मराठी


पुढारी




1 comment: