Pages

Saturday, 23 December 2017

Saturday, 16 December 2017

मा. श्री पोपटराव पवार यांची हिवरे बाजार येथे सदिच्छा भेट

राहूरी शिक्षक मित्रमंडळाच्या वतीने आदरणीय पोपटराव पवार यांची सस्नेह भेट*

_आज आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे भूषण,आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष,आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच श्री पोपटराव पवार यांची राहूरी तालुका शिक्षक मित्रमंडळाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.राहूरी तालुका शिक्षक मित्रमंडळाने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती आदरणीय पोपटराव पवार यांना दिली.त्यांनी मित्रमंडळाच्या  सामाजिक उपक्रमांबद्दल मित्रमंडळाचे कौतुक केले व आगामी काळात शिक्षक,विद्यार्थी या बरोबरच समाजातील इतर घटकांसाठीही उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. स्वतःचे काही अनुभव सांगून त्यांनी सांगितले की चांगल्या कामात अनेक अडचणी येतात. या प्रसंगी शिक्षक मित्रमंडळाचे सरचिटणीस अनिल पवार,अनिलजी विधाते ,प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय राहुरीच्या प्रमुख नंदादीदी उपस्थित होते.